Sunday, May 29, 2011

'दादर' होणार चैत्यभूमी!३० कॉर्पोरेटचा पगार एक कोटीपेक्षा जास्त!

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8631941.cms

३० कॉर्पोरेटचा पगार एक कोटीपेक्षा जास्त
मुकेश अंबानी यांच्यासह भारतीय उद्योग (कॉर्पोरेट) क्षेत्रातील ३० जणांचा वार्षिक पगार एक कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. यात रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी तसेच त्यांच्याच कंपनीचे आणखी चार सदस्य यांचा समावेश आहे. 

जेएसडब्ल्यू एनर्जी कंपनीचे सज्जन जिंदाल, हिंदुस्तान कन्स्ट्रक्शनचे अजित गुलाबचंद, रेमंडचे गौतम हरी सिंघानिया, आयसीआयसीआय बँकेच्या प्रमुख चंद्रा कोचर अॅक्सिस बँकेच्या शिखा शर्मा यांचा वार्षिक पगार देखिल एक कोटी रुपयांपेक्षा जास्त आहेत. 

देशभरातील कंपन्या सध्या आपले वार्षिक अहवाल सार्वजनिक करत आहेत. या निमित्ताने विविध कंपन्यांच्या उच्चपदस्थांच्या पगाराचे आकडे जाहीर होत आहेत. उपलब्ध आकडेवारीनुसार, १३ बड्या कंपन्यांच्या निवडक उच्चपदस्थांना एक कोटीपेक्षा जास्त रकमेचे पॅकेज मिळाले आहे. 

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मुकेश अंबानी यांच्यासह निखिल मेसवानी, हितल मेसवानी, पीएमएस प्रसाद आणि पवन कुमार कपिल यांचे वार्षिक पॅकेज एक कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. 

आयसीआयसीआय बँकेत चंद्रा कोचर यांच्यासह चारजणांचे पॅकेज एक कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. इन्फोसिस कंपनीच्या पाच जणांचे पॅकेज एक कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. तसेच जेएसडब्ल्यू एनर्जी कंपनीमध्ये सज्जन जिंदाल यांच्यासह एन के जैन, ललित कुमार गुप्ता आणि एस एस राव या तीन जणांचे वार्षिक पॅकेज एक कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. 


'दादर' होणार चैत्यभूमी! राष्ट्रवादीची खेळी
29 May 2011, 1802 hrs IST 
 
शिवशक्ती आणि भीमशक्ती एकीकरणाचे नगारे मोठमोठ्याने वाजत असतानाच, युतीच्या राजकारणाला प्रतिशह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने नवी खेळी रचली आहे. मुंबईतील गजबजलेल्या व मध्यवर्ती मोक्याच्या ठिकाणी असलेल्या दादर रेल्वे स्थानकाचे चैत्यभूमी असे नामांतर करण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादीने तयार केला असून, लवकरच राज्य व केंद्र सरकारकडे तो मंजुरीसाठी पाठवण्यात येणार असल्याचे समजते. 

येत्या १० जून राष्ट्रवादी काँग्रेसने वर्धापनदिनाच्या मुहूर्तावर मागासवर्गीय हक्क परिषद आयोजित केली आहे. या परिषदेमध्ये दादर स्थानकाचे चैत्यभूमी स्थानक असे नामांतर करण्याचा प्रस्ताव मांडण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

आगामी महापालिका निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजप युतीमध्ये रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या निमित्ताने तिसरा भिडू सामील झाला आहे. शिवशक्ती आणि भीमशक्तीचे एकत्रित मेळावे राज्यभरात आयोजिण्यात येत आहेत. दलित मते मिळवण्यासाठी शिवसेना-भाजप युतीच्या नेतृत्वाने आखलेला हा डाव परतवून लावण्यासाठीच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही व्यूहनिती आखली आहे. दलितांना चुचकारण्यासाठीच दादर स्थानकाचे चैत्यभूमी असे नामांतर करण्याची आयडियाची कल्पना राष्ट्रवादी नेतृत्वाला सुचली आहे. 

दादर चौपाटीजवळील चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक आहे. १४ एप्रिलला डॉ. आंबेडकर जयंतीला तसेच ६ डिसेंबर रोजी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणदिनी देशभरातून करोडो अनुयायी याठिकाणी दर्शनासाठी येतात. आंबेडकरी जनतेच्या भावना लक्षात घेऊन १९९६-९७ सालीच तत्कालिन रेल्वेमंत्री रामविलास पासवान यांनी दादर स्थानकाचे चैत्यभूमी असे नामांतर करण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र नियमानुसार असा प्रस्ताव राज्य सरकारकडून रेल्वे खात्याला पाठवावा लागतो. त्यावेळी राज्यात सेना-भाजप युतीचे सरकार असल्याने त्यांनी असा प्रस्ताव पाठवला नाही. मात्र आता सत्ताधारी राष्ट्रवादीने नामांतराचा प्रस्ताव आणल्यास शिवसेनेला विरोध करता येणार नाही. शिवसेनेची कोंडी करतानाच, दलितांची मते आकर्षित करण्याचा राष्ट्रवादीचा दुहेरी उद्देश या प्रस्तावामागे असल्याचे बोलले जात आहे.

यापूर्वी व्हीटी रेल्वे स्थानकाचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कुर्ला रेल्वे स्थानकाचे लोकमान्य टिळक टर्मिनस, कोल्हापूर स्थानकाचे छत्रपती शाहू महाराज टर्मिनस आणि नांदेड स्थानकाचे हुजूरसाहिब नांदेड असे नामांतर करण्यात आल्याची उदाहरणे महाराष्ट्रात आहेत

शिवसेना, भाजपसह दहा वर्षांचा घरोबा
29 May 2011, 0324 hrs IST 
 म. टा. प्रतिनिधी 

काँगेस-राष्ट्रवादी काँगेसबरोबर दिलेल्या वचनानुसार 20 वर्षे राहिलो; पण आरपीआयच्या कार्यकर्त्यांना काहीही मिळाले नाही. आता शिवसेना-भाजपबरोबर दहा वर्षे राहणार आहे. ऑक्टोबर महिन्यात शिवशक्ती-भीमशक्तीचा निवडणुकीचा अजेंडा तयार होणार असून, त्याचा तोंडीऐवजी लेखी करारनामा लिहून घेणार असल्याचे आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी शनिवारी जाहीर केले. 

नऊ जून रोजी मुंबईत होणाऱ्या मेळाव्याची पूर्वतयारी म्हणून घेतलेल्या या मेळाव्याला शिवसेना आणि आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. त्या तुलनेत भाजपचे कार्यकर्ते तुरळक होते. खासदार गोपीनाथ मुंडे हे पुण्यात असतानादेखील मेळाव्याला अनुपस्थित राहिले. मेळाव्याला शिवसेना नेते सुभाष देसाई, खासदार गजानन बाबर, भाजपचे सरचिटणीस आमदार विनोद तावडे, शिवसेनेच्या संपर्कनेत्या आमदार नीलम गो-हे, आमदार गिरीश बापट, चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर, विजय शिवतारे, भाजपचे अध्यक्ष विकास मठकरी, शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना वाडेकर, अर्जुन डांगळे, आरपीआय मातंग संघटनेचे हनुमंत साठे, परशुराम वाडेकर, एम. डी. शेवाळे, श्रीरंग बारणे उपस्थित होते. 

मी दिलेले वचन पाळत असतो. काँगेस-राष्ट्रवादी काँगेसला दिलेले वचन 20 वर्षे पाळले. आता नेत्यांची तिसरी आघाडी होणार नसल्याने शिवसेना-भाजपशी दहा वर्षे तरी राहणार आहे. त्यापुढचे माहीत नाही. त्यानंतर शिवशक्ती-भीमशक्तीचे राज्य असेल. नऊ जून रोजी मुंबईत होणाऱ्या मेळाव्यानंतर इको-सोसिएल कार्यक्रम जाहीर केला जाईल. ऑक्टोबर महिन्यात निवडणुकीचा अजेंडा तयार होईल. त्यावेळी तोंडी आश्वासनांऐवजी लेखी करारनामा करणार आहे.' असे आठवले यांनी स्पष्ट केले. 

शिवसेना आणि भाजपशी काही मतभेद असले, तरी राजकारणात कोणीही कायम दुष्मन नसतात, हे मला आज कळले आहे. शिवसेनेच्या प्रत्येक शाखेत आता 'जय भीम'चा आवाज घुमत आहे, तर भाजपच्या शाखांमध्ये 'जय महाराष्ट्र' आणि 'जय भीम'चा नारा असल्याचे आठवले म्हणाले. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाकिस्तानवर हल्ला करण्याबाबत केलेल्या वक्तव्याला आठवले यांनी पाठिंबा दर्शविला. देशातील मुस्लिमांना संरक्षण देण्याची आमची जबाबदारी आहे. बाळासाहेबांच्या संरक्षणासाठी आता शिवसैनिकांबरोबरच भीमसैनिकही आहेत, असे त्यांनी सांगितले. 

शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येण्यामागे सत्ता मिळविणे हेच उद्दिष्ट नाही. तसेच सूड उगविण्यासाठीही एकत्र आलेलो नाही, तर समाज परिवर्तनासाठी हा प्रयोग करत आहोत, असे आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

शरद पवार यांच्याबद्दल आदर आहे. मात्र, काँगेस-राष्ट्रवादी काँगेसने आरपीआयच्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केले, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. शिर्डीमध्ये पराभव झाल्यानंतर पवार यांनी सुप्रिया सुळे यांची राज्यसभेची जागा देण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, ती स्वीकारली नाही. आता सोनिया गांधी यांनी आग्रह धरला, तरी कोठेही जाणार नाही, असे आठवले यांनी नमूद केले. 

मान्सून लांबला, पण राज्यात पाऊस!

गेले काही महिने उन्हाच्या काहिलीने हैराण झालेल्या मुंबईकरांना दिलासा देणारे वृत्त कुलाबा वेधशाळेने दिले आहे. येत्या ४८ तासात मुंबईसह राज्याच्या अनेक भागांत गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. असे असले तरी मान्सून मात्र नेहमीपेक्षा थोडा लांबला आहे. 

साधारणतः २० मेच्यासुमारास मोसमी पाऊस अंदमानमध्ये पोहोचतो पण यंदा त्यास विलंब झाला असून अजून तो तेथे पोहोचण्यास दोन दिवस तरी लागतील. केरळमध्ये एक जूनच्या आसपास तो पोहोचतो. मोसमी पावसाच्या प्रगतीला सध्या तरी पोषक वातावरण नाही. त्यामुळे केरळमध्येही तो पोहोचण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. 

हे असे असले तरी, महाराष्ट्रात पूर्वमोसमी पावसाला पोषक वातावरण आहे. त्यामुळे येत्या ४८ तासांत पश्चिम विदर्भ वगळता कोकणपट्टी दक्षिण व मध्य महाराष्ट्र मराठवाडा पूर्व विदर्भ आदी भागांत गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. 

सध्या मुंबईत ढगाळ वातावरण असून तापमान सरासरी ३४ अंशाच्या आसपास आहे. त्यामुळे या पूर्वमोसमी पावसामुळे तापमानात किंचित घट होण्याची शक्यता आहे.


३० कॉर्पोरेटचा पगार एक कोटीपेक्षा जास्त
29 May, 2011, 1313 hrs IST, 
मुकेश अंबानी यांच्यासह भारतीय उद्योग (कॉर्पोरेट) क्षेत्रातील ३० जणांचा वार्षिक पगार एक कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. यात रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी तसेच त्यांच्याच कंपनीचे आणखी चार सदस्य यांचा समावेश आहे.

व्यापारात थेट परकीय गुंतवणूक- महागाईवरील उतारा
28 May, 2011, 0144 hrs IST, 
भारतातील किरकोळ व्यापार क्षेत्र (रिटेल सेक्टर) हे प्राचीन ('प्रिमिटिव्ह') असून, जीवनावश्यक व अन्य वस्तूंच्या वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी 'मल्टि ब्रॅण्ड रिटेल' व्यापारात थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी द्यावी, अशी सूचना आंतर मंत्रालय गटाने सरकारला केली आहे.
'राँगफुल एटीएम डेबिट'चा परतावा सात दिवसांत
28 May, 2011, 0143 hrs IST, 
भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी जारी केलेल्या आदेशात अशा 'राँगफुली 'एटीएम डेबिटेड' रकमांचा परतावा बँक ग्राहकाला त्याची तक्रार आल्यानंतर सात दिवसांत देण्यास सांगितले आहे. बँकांनी सात दिवसांत हा 'रिफंड' न दिल्यास संबंधित ठेवीदाराला दररोज १०० रु. प्रमाणे दंड द्यावा लागणार आहे.
गुंतवणुकीला द्या 'लिक्विड फंडा'ची जोड
28 May, 2011, 0142 hrs IST, 
बचतीवर ७ टक्के उत्पन्न अर्थात 'रिटर्न' मिळते. होय, बचतीच्या पैशांवर ७ टक्के उत्पन्न मिळू शकते. बँकेतील 'सेव्हिंग्ज अकाउंट'वर चार टक्के दराने व्याज मिळते, ही गोष्ट सर्वांनाच माहीत आहे. म्हणूनच मग प्रश्न पडतो, की प्राथमिक बचतीवरील 'रिटर्न' दुप्पट कसे काय केला जाऊ शकते?
शेअर बाजारात आणखी उत्साह!
28 May, 2011, 0138 hrs IST, 
जागतिक पातळीवरील प्रमुख शेअर बाजारांत आलेल्या उमेद वाढविणाऱ्या तेजीच्या कलामुळे भारतीय शेअर बाजारांत शुक्रवारी उत्साहाचे आणखी उधाण येऊन भरभरून खरेदी झाली. परिणामी 'सेन्सेन्स' आणखी घसघशीत २२१ अंशांनी उंचावला.
भारताच्या आर्थिक वाढीत इंटरनेटचा हिस्सा फक्त ३.२ टक्के
27 May, 2011, 0058 hrs IST, 
भारताच्या ठोक देशी उत्पादनात अर्थात 'ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट'मध्ये ('जीडीपी') इंटरनेटचा हिस्सा किती आहे? मॅकेंझी अँड कंपनीच्या 'मॅकेंझी ग्लोबल इन्स्टिट्यूट' ('एमजीआय') या संस्थेने केलेल्या संशोधनातून दोन वर्षांपूवी म्हणजेच २००९ मध्ये हा वाटा ३.२ टक्के असल्याचा निष्कर्ष काढला आहे.
फळे, दूध, कांदा, अंडी महागली
27 May, 2011, 0056 hrs IST, 
फळे, दूध, कांदा, अंडी, मांस आणि मटण यांच्या भावात वाढ झाल्याने अन्नधान्यांच्या घाऊक भावांवर आधारित निदेर्शांकात पुन्हा वाढ झाली आहे.
शेअर बाजारात हुरूप, सेन्सेक्स + १९७
26 May, 2011, 2207 hrs IST, 
अन्नधान्यांच्या घाऊक भावांवर आधारित निर्देशांक वाढल्याच्या वृत्ताकडे शेअर बाजारांनी गुरूवारी दुर्लक्ष केले आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांनी बड्या कंपन्यांच्या शेअर्सच्या केलेल्या खरेदीमुळे 'सेन्सेक्स' मागील 9 आठवड्यांच्या नीचांकावरून 197 अंशांनी वधारून 18,045 अंशांवर आला.
'आयफोन फोर' भारतात!
26 May, 2011, 0902 hrs IST, 
भारतात २७ मे रोजी 'अॅपल'चा आयफोन फोर सादर होईल. भारती एअरटेल आणि एयरसेल या कंपन्या तो उपलब्ध करून देणार आहेत. भारतात बहुतके कंपन्यांनी थ्रीजी मोबाईल सेवा सुरू केली आहे.
नोकरी पाहिजे; मग चॅटिंग करा!
26 May, 2011, 0434 hrs IST, 
तुमच्या भविष्यातील कर्मचाऱ्यांशी संपर्क आणि संवाद साधायचाय? तर मग वाट कसली पाहताय..नोकरीच्या शोधात असणारे आणि कर्मचाऱ्यांची आवश्यकता असणाऱ्यांची भेट घडवून आणणारी वेबसाइट नुकतीच लाँच झाली.
धान्यनिर्यातीबाबत निर्णय दोन आठवड्यांत
26 May, 2011, 0434 hrs IST, 
गेल्या वषीर्च्या उत्तम मान्सूनमुळे देशात गहू आणि तांदळाचे विक्रमी उत्पादन झाल्याने सरकारी गोदामांमधे मोठ्या प्रमाणावर धान्य शिल्लक आहे. यंदाही चांगल्या मान्सूनची शक्यता लक्षात घेता, देशातील अतिरिक्त धान्यसाठ्याच्या निर्यातीस परवानगी द्यावी का, याबाबत अर्थमंत्री प्रणव मुखजीर् यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिगट येत्या दोन आठवड्यांत निर्णय घेईल, अशी माहिती कृषी विभागाच्या गोटातून देण्यात आली.
आयटी कंपन्यांना दणका
26 May, 2011, 0433 hrs IST, 
शेअर बाजारात बुधवारीही विक्रीचा जोर कायम राहिला. गुंतवणूकदारांनी आयटी कंपन्यांना विशेष लक्ष्य केले.
'प्रॉव्हिडंट फंड'ची माहिती एका क्लिकवर!
26 May, 2011, 0432 hrs IST, 
'एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड'च्या (इपीएफओ) सभासदांना लवकरच आपल्या खात्यातील व्यवहारांचे तपशील ऑनलाइन पाहता येणार आहेत. आपल्या खात्यावरील जमा रकमेची माहिती मिळावी आणि 'एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड'च्या प्रादेशिक कार्यालयांवरील ताण कमी करणे या दुहेरी उद्देशांपोटी ही खाती ऑनलाइन करण्यात येणार आहेत.
आयटी कंपन्यांना दणका
25 May, 2011, 1830 hrs IST, 
शेअर बाजारात बुधवारीही विक्रीचा जोर कायम राहिला. गुंतवणूकदारांनी आयटी कंपन्यांना विशेष लक्ष्य केले.
ज्वारीच्या कडब्याचे भावही वाढले
25 May, 2011, 0247 hrs IST, 
यावर्षी जिल्ह्यातील मालदांडी ज्वारीबरोबरच ज्वारीच्या कडब्याचा भावदेखील वाढला असून, त्यामुळे पशुपालक हैराण झाले आहेत.
बिरनवाडीतील विषबाधा एण्डोसल्फानमुळे?
25 May, 2011, 0247 hrs IST, 
तासगाव तालुक्यातील बिरनवाडी येथील मोरे कुटुंबातील चौघांचा अन्नातून विषबाधेमुळे मृत्यू झाल्याने गावात खळबळ उडाली आहे. अन्नात चुकून एण्डोसल्फान पडल्यामुळे ही घटना घडली असावी अशी शक्यता जिल्हा हॉस्पिटलच्या अधिष्ठाता डॉ. कल्पना सुल्ह्यान यांनी व्यक्त केली आहे.
'बॉण्ड्स'वरील सूट ही वेगळी मिळते
25 May, 2011, 0246 hrs IST, 
आथिर्क वर्ष 2010-11 मध्ये मी 'लाँग टर्म इन्फ्रास्ट्रक्चर बॉण्ड्स'मध्ये 30,000 रु.ची गुंतवणूक केली आहे. मला आयकर बचतीच्या दृष्टीने काय लाभ मिळेल?
'सेन्सेक्स' पुन्हा अठरा हजारांवर!
25 May, 2011, 0245 hrs IST, 
जागतिक पातळीवरील शेअर बाजारांत, विशेषत: युरोपीय शेअर बाजारांत आलेल्या तेजीच्या कलामुळे देशातील शेअर बाजारांत मंगळवारी मोठे चढउतार झाले. संस्थात्मक गुंतवणूकदारांनी यंत्रसामग्री उत्पादक ('कॅपिटल गुड्स') कंपन्या आणि बँकांच्या शेअर्सची उतरलेल्या भावांना खरेदी केल्यामुळे सोमवारी 18 हजार अंशांखाली घरगळलेला 'सेन्सेक्स' आज पुन्हा अठरा हजारांच्या वर आला.
'इर्डा'च्या कडक नियमांचा विमाधारकांना लाभ!
25 May, 2011, 0240 hrs IST, 
गेल्या आथिर्क वर्षात 'युनिट लिंक्ड् इन्शुरन्स प्लॅन्स'मुळे ('युलिप्स') विमा उद्योगासमोर मोठे संकट निर्माण झाले होते. 'युलिप्स'वर घालण्यात आलेल्या बंधनांमुळे पॉलिसीधारकांना फायदा झाला आहे. या पार्श्वभूमीवर इन्शुरन्स कंपन्यांनी पॉलिसींमध्ये अधिक स्पष्टता आणल्याने त्यांना कामगिरीत सातत्य दाखविता आले आहे.
सरकारी बँका करणार ४५ हजार कर्मचारी भरती
24 May, 2011, 1829 hrs IST, 
मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणात कमतरता निर्माण झाल्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँका (पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्ज-'पीएसयु') २०११-१२ आर्थिक वर्षात सुमारे ४५ हजार कर्मचारी भरती करण्याची योजना आखत आहेत.
पत नसताना कर्जे द्यायला लावली
24 May, 2011, 0551 hrs IST, 
वारंवार मागणी करून, न्यायालयाकडे दाद मागूनही राज्य शासनाने १८३१ कोटी रुपयांची थकहमीची रक्कम राज्य सहकारी बँकेला वेळेत दिली नाही, त्यामुळेच राज्य बँकेवर आताची नामुष्कीची पाळी आली.
व्याजदर वाढीची झळ गृहकर्जास नको
24 May, 2011, 0548 hrs IST, 
'रेपो' दरातील वाढ ही गृहकर्जावरील व्याजदरांत वाढ होण्याचा संकेत असते आणि त्या प्रमाणेच झाले. त्यामुळे 'ईएमआय' आवाक्यात राहण्यासाठी आपणच खबरदारी घ्यायला हवी.
'महिंद सत्यम'ला तिमाहीत ३२७ कोटींचा तोटा
24 May, 2011, 0547 hrs IST, 
संस्थापक बी. रामलिंग राजू यांच्या महाघोटाळ्यानंतर महिंद समूहाने खरेदी केलेल्या महिंद सत्यम (सत्यम कम्प्युटर) या 'आयटी' क्षेत्रातील प्रमुख कंपनीने मार्च २०११ अखेर संपलेल्या चौथ्या तिमाहीत ३२७ कोटी रु.चा तोटा नोंदविला आहे.
सेन्सेक्सचा दोन महिन्यांतील नीचांक!
23 May, 2011, 1832 hrs IST, 
महागाई, चढे व्याजदर, युरोपमधली मंदी यांच्या परिणामी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सोमवारी बड्या कंपन्यांचे शेअर्स सपाटून विकले. त्यामुळे 'सेन्सेक्स' गडगडून १८ हजाराच्या खाली, दोन महिन्यांतील नीचांकावर आला.
रिझर्व्ह बँक आणखी व्याजदर वाढविणार?
23 May, 2011, 0046 hrs IST, 
नियंत्रणाबाहेर जाणाऱ्या जीवनावश्यक व अन्य वस्तूंच्या महागाईला आळा घालण्यासाठी भारतीय रिर्झव्ह बँक पुन्हा चलनपुरवठा कपातीचा उपाय योजण्याची, महत्त्वाचे धोरणात्मक व्याजदर आणखी पाऊण टक्क्याने वाढविण्याची शक्यता जागतिक पातळीवरील महाकाय बँकिंग कंपनी 'गोल्डमन सॅक्स'ने व्यक्त केली आहे.
ममतांचे अर्थमंत्री
29 May 2011, 0000 hrs IST
>> महेश सरलष्कर 


ग्लोबलायझेशन आणि खुल्या अर्थकारणाचे खंदे समर्थक असणाऱ्या अमित मित्रांना ममता बॅनजीर्ंनी 'बंगालसाठी तुम्ही हवे आहात', असं सांगत दिल्लीहून कोलकात्याला परत बोलावलं. ममतांच्या विनंतीला मान देत मित्रा 'माँ माटी मानुष'कडं परतले... 
.......... 

बारीक अंगकाठी... चेहऱ्यावर स्मित हास्य... डोळ्यात आश्वस्त भाव... बोलण्यात रसगुल्ल्याची मिठास... तरीही, ठाम आणि स्पष्ट मांडणी... असं आपलंसं करणारं व्यक्तिमत्व दरवषीर् बजेटच्या चर्चांमध्ये दिसतं. हे व्यक्तिमत्व आता पश्चिम बंगालच्या अर्थमंत्रीपदावर जाऊन बसलंय, तेही 'जायंट किलर' बनून; डाव्यांचे हायप्रोफाइल अर्थमंत्री असीम दासगुप्ता यांना मात देत... 

अमित मित्रा! भारतातल्या उद्योग क्षेत्राचा संस्थात्मक 'आवाज'. गेल्या १७ वर्षांत फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिकी) म्हणजेच मित्रा, असं समीकरण झालं होतं. 'फिकी'चे सरचिटणीस म्हणून आथिर्क मुद्द्यावर मित्रांनी मांडलेली भूमिका सरकारच्या निर्णयप्रक्रियेत गांभीर्याने घेतली जाते. ग्लोबलायझेशन आणि खुल्या अर्थकारणाचे खंदे समर्थक असणाऱ्या 'बंगाली' मित्रांना ममता बॅनजीर्ंनी 'बंगालसाठी तुम्ही हवे आहात', असं सांगत दिल्लीहून कोलकात्याला परत बोलावलं. ममतांच्या विनंतीला मान देत मित्रा 'माँ माटी मानुष'कडं परतले. 

अख्खं आयुष्य थ्री-पीस सुटमध्ये वावरणारे... दिवसागणिक परदेशी शिष्टमंडळांना भेटणारे... परदेशवारी करणारे... पंचतारांकित हॉटेलमध्ये उद्योग-व्यापारावरच्या चर्चासत्रांत रमणारे मित्रा, खरडा मतदारसंघात तृणमूलचे उमेदवार म्हणून मळक्या ओबडधोबड रस्त्यांवर सामान्य दरिदी बंगाली माणसांशी तितक्याच हसरेपणाने संवाद साधू लागले. 'राजकीय अर्थशास्त्रा'ची वास्तववादी माहिती घेऊ लागले. रिटेल क्षेत्रात शंभर टक्के परदेशी गुंतवणूक हवीच, असं म्हणणारे मित्रा छोट्या किराणा दुकानदारांनाही संरक्षण मिळायला हवं, अशी मध्यममागीर् भाषा बोलू लागले. 

खरंतर मित्रांना राजकारण नवं नाही. त्यांचं कुटुंब स्वातंत्र्यसंग्रामात होतं. मित्रांची आई बेला ही नेताजी सुभाषचंद बोस यांची भाची. वडील हरिदास मित्रा, हे नेताजींच्या आझाद हिंद फौजेत गुप्तहेर संस्थेचं काम पाहात. दुदैर्वाने ते ब्रिटिशांच्या हाती लागले. त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली होती, पण महात्मा गांधींनी व्यक्तिश: लॉर्ड व्हावेली यांच्याकडं मध्यस्थी करून हरिदास यांची मुक्तता केली. गुप्तहेर संस्थेतील हरिदास यांची धुरा बेला यांनीही वाहिली. बंगालमध्ये त्यांच्या नावे बेलानगर हे रेल्वेस्टेशनही आहे. हरिदास हे पुढे बंगाल विधानसभेचे उपाध्यक्षही झाले. हा 'राष्ट्रवाद' घेऊनच अमित मित्रा खरडाच्या मतदारांना सामोरे गेले आणि विजयी झाले! 

अमित मित्रांनी आईवडिलांकडून राजकारणाचं बाळकडू घेतलं, पण आतापर्यंत ते प्रत्यक्षात आणलं नव्हतं इतकंच. मित्रांचा ओढा अर्थशास्त्राकडं होता. शाळा-कॉलेजचं शिक्षण त्यांनी बंगालमध्येच घेतलं. पुढे 'दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मधून अर्थशास्त्राची पदवी घेऊन मित्रा अमेरिकेला गेले. ड्युक विद्यापीठात त्यांनी पीएच्.डी. पूर्ण केली आणि त्यानंतर ते शिक्षकी पेशात शिरले. दहा वर्षांहून अधिक काळ त्यांनी अमेरिकेत अध्यापक म्हणून काढली. जगभरातील अनेक कॉलेजं-विद्यापीठांतील विद्यार्थ्यांसमोर मित्रांनी आपला आथिर्क दृष्टिकोन मांडला. अध्यापनाच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल अमेरिकेत त्यांना गौरवलं गेलं आहे. 

नव्वदच्या दशकात मित्रांचं भारतातलं करिअर सुरू झालं. खुल्या अर्थव्यवस्थेचं वारं जोरात वाहू लागलं होतं. त्याच काळात मित्रा यांनी दर्जाहीन आणि काही उद्योग घराण्यांचीच मक्तेदारी असणाऱ्या 'फिकी'च्या सरचिटणीसपदाची जबाबदारी स्वीकारली. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) ही उद्योगक्षेत्राचं प्रतिनिधित्व करणारी एकमेव संस्था, अशी ओळख पुसून टाकून 'फिकी'लाही दजेर्दार संस्थेचं स्वरूप दिलं. या कर्तृत्वामुळंच ते देशाच्या आथिर्क धोरणाच्या निर्णयप्रक्रियेतील महत्त्वाची व्यक्ती मानले जाऊ लागले. ते वाजपेयींच्या 'एनडीए'लाही आपलेसे वाटले आणि मनमोहन सिंग यांच्या आघाडी सरकारनंही न अव्हेरता पद्मश्री देऊन त्यांना सन्मानित केलं! 

मित्रांनी 'फिकी'मध्ये तरुण अभ्यासकांकडून उद्योग-व्यापार आणि अर्थविषयक संशोधन करवून घेतलं. 'फिकी'ला चालना देत असताना मित्रा स्वत: देखील अनेक सरकारी उद्योगांच्या मार्गदर्शनात सक्रीय झाले. गेल, सेल, यूटीआय, आयडीबीआय, एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्सची नवी कंपनी अशा कित्येक कंपन्यांमध्ये ते संचालक होते. 'बाटा'सारख्या बहुराष्ट्रीय कंपनीच्या बोर्डावरही ते होते. रेल्वेमंत्री होताच ममता बॅनजीर् यांनी मित्रांना तज्ज्ञ समितीचं अध्यक्ष बनवलं. सरकारी-खासगी संयुक्त प्रकल्पाचा प्रयोग मित्रांच्याच समितीमुळे रेल्वेत राबवला गेला. समितीच्या कामकाजाच्या निमित्तानं मित्रांचा ममतांशी सुसंवाद वाढला आणि ममतांनी त्यांना बंगालच्या अर्थकारणाची जबाबदारीही देऊन टाकली. 

डाव्यांना औद्योगिकीकरण आणि खासगी गुंतवणुकीचं महत्त्व समजलं होतं, पण त्याला त्यांच्याच कार्यर्कत्यांनी विरोध केला आणि नंतर ममतांनी डाव्यांचे प्रयत्न सिंगूरमध्ये हाणून पाडले. त्यातून सत्ता मिळाली तरी, ममतांची प्रतिमा उद्योग-गुंतवणूकविरोधी बनली आहे. पण पश्चिम बंगालला आथिर्क गतेर्तून बाहेर काढण्यासाठी उद्योग उभारणी आणि त्यासाठी गुंतवणूक करावीच लागणार आहे. डावे जे करण्याचा प्रयत्न करत होते, तेच धोरण ममतांना यशस्वी करून दाखवावं लागेल. हाच ममतांचा सर्वात मोठा राजकीय विरोधाभास आहे. या विरोधाभासाचा चेहरा मित्रांच्या रूपात उभा राहिला आहे. 'सिंगूरमधून टाटांना ममतांनी घालवलं नाही... टाटा बंगालमध्ये परत येतील', ही अर्थमंत्री मित्रांची वक्तव्यं विरोधाभासातून मार्गक्रमण किती कठीण आहे, याचंच दृश्यरूप आहेत. या दिव्यातून पार होत बंगालमध्ये 'आथिर्क परिवर्तन' मित्रा कसं घडवून आणतात, यावर ममतांच्या राजकीय प्रतिमेचं परिवर्तन अवलंबून आहे. 'ममतांच्या अर्थमंत्र्यां'समोर हेच मोठं आव्हान आहे. 
 
पुढे »

अर्थ
शेअर बाजार
अन्य सूचकांक  |  बाजारातील आकडेमोड
  
ET Portfolio Wizard.ET Portfolio Wizard
लक्षवेधी...
क्रीडा
पेस-भूपती गारदपेस-भूपती गारद
भारताच्या पेस-भूपती जोडीला फ्रेंच ओपनच्या दुस-याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला.
मटा विशेष
वन टू का 'आयपीएल-फोर'!
वन टू का 'आयपीएल-फोर'!
वर्ल्ड कप विजयाचा जल्लोष शांत होत नाही, तोच 'आयपील IV'चा फीव्हर सुरू झालाय. या झटपट क्रिकेटबद्दलची ही तुफान फटकेबाजी...
आणखी »
.


No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Census 2010

Welcome

Website counter

Followers

Blog Archive

Contributors