Thursday, October 31, 2013

शरद पवारांची सारवासारव

शरद पवारांची सारवासारव

sharad-p300
वृत्तसंस्‍था, नवी दिल्ली

आगामी निवडणुकीत काँग्रेससोबतच राहणार असून तिसऱ्या आघाडीत सहभागी होणार असल्याचे वृत्त चुकीचे आहे, अशी सारवासारव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कृषीमंत्री शरद पवार यांनी गुरुवारी केली. पुढील वर्षी होत असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा काँग्रेसलाच पाठिंबा राहिल, असे यावेळी बोलताना त्यांनी स्पष्ट केले.

विरार येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमप्रसंगी पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, 'डाव्या आघाडीच्या बुधवारी झालेल्या बैठकीस त्यांच्या पक्षाच्या नेत्याने हजेरी लावली होती. समविचारी पक्षाचे नेते ए‌क‌‌‌‌‌त्रित आल्याने आमच्या पक्षाचा प्रतिनिधी त्या बैठकीस हजर होता. याचा अर्थ आम्ही केंद्रातील यूपीए आघाडीच्या बाहेर पडतो, अथवा त्यांची सोबत सोडत आहोत असा होत नाही.' असेही ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Census 2010

Welcome

Website counter

Followers

Blog Archive

Contributors